Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी महिलांना मोफत गॅस सिलिंडर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी ३० लाख महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब महिलांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.

देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचा फटका गरीब जनतेला बसू नये यासाठी केंद्र सरकारनं आज त्यांना दिलासा देणाऱ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांसाठीही महत्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी ३० लाख महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

महिला जन-धन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रूपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. यामुळं जवळपास २० कोटी महिला लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version