Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उचंदा येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर अडीच क्विंटल केळीची आरास

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | तालुक्यातील उचंदे येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त केळीच्या घडांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.

 

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे  मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी येत आहेत संत मुक्ताई भजनी मंडळ यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली. जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते त्या भक्तांनी आज सकाळी विठ्ठल रुक्माई मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, आज एकादशी निमित्त शांताराम पंढरीनाथ पाटील व राजेंद्र गजमल पाटील यांच्या शेतातील अडीच क्विंटल केळीची आरास करण्यात आली आहे.

 

पाटील यांच्या शेतातील केळी मात्र विठ्ठल रुक्माई मंदिरात लावलेल्या आरास त्यामुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी गोपाळ महाराज विश्वनाथ महाराज विलास महाराज यासह टाळकरी मंडळ तसेच राजेंद्र पाटील, सोपान पाटील, संदीप पाटील, छबिलदास पाटील, भगवान श्रीखंडे तुकाराम धनगर आदी उपस्थित होते.

Exit mobile version