Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उंदावद येथील शेतकऱ्याच्या हॉटेलातून १० हजाराची रोकड लांबविली

अडावद प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या उंटावद येथील शेतकऱ्याच्या शेतातील हॉटेलातून १० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विद्याधर गणपत पाटील (वय-५९) रा. उंटावद ता. यावल ह.मु. अंबरथान ठाणे यांचे चोपडा तालुक्यातील धानोरा ते चिंचोली गावाच्या दरम्यान यश नावाचे हॉटेल आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हॉटेलातील गल्ल्यातून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विद्याधर पाटील यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जगदीश कोळंबे करीत आहे.

Exit mobile version