उंटावद येथे लसीकरणाला उस्त्स्फुर्त प्रतिसाद

यावल,  प्रतिनिधी  । गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या प्रयत्नांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लसीकरण मोहीम ही अंतीम टप्प्यात आली आहे असे मनोगत वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी व्यक्त केले. 

त्या  जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.   दरम्यान त्यांच्या विशेष  प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना गावातच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्थित नियोजन उंटावद येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले होते. संपुर्ण जगासह देशात थैमान घातलेल्या कोव्हीड १९ (कोरोना) या महामारीपासून बचावासाठी संपुर्ण देशभर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक लसिकरण मोहीम राबविण्यात देत आहे.  या कार्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्येरत आहे . दरम्यान, किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्राअंतर्गत येणाऱ्या उंटावद या गावाची १०० टक्के लसिकरणाकडे वाटचाल सुरू असून आजपर्येंत ८० टक्के लसिकरण येथे झाले आहे तर लवकरच उंटावद हे गाव लसीकरणाचा अंतीम टप्पा गाठेल.   या मोहीमेस यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचाही लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी डॉ.  मनिषा महाजन यांनी  सांगितले.  उंटावद येथील ग्रामस्थ किनगाव प्राथमीक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घेत होते व नागरीकांचा लसिकरणाबाबत प्रतिसाद पाहता वैद्यकिय आधीकारी डॉ. मनिषा महाजन यांनी उंटावद येथील जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेत दि. २७ रोजी १६५ लसींची व्यवस्था करून दिली.   दि. ३० रोजी २३० तर दिनांक ४ सप्टेंबर २२२ लसींची व्यवस्था करून दिली. यामुळे ग्रामस्थांनी डॉ. मनिषा महाजन, डॉ.वकार शेख, आरोग्य सेविका  के.आर.सुर्यवंशी ,आरोग्य सेवक विठ्ठल भिसे , आरोग्य सेवक डी. पी. तायडे आणि आशा सेविका किरण पाटील तसेच वाहन चालक कुर्बान तडवी यांचे आभार व्यक्त केले.

 

Protected Content