Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त व्याख्यानमाला

जळगाव, प्रतिनिधी | ईद-ए-मिलादुन्नबी अर्थातच हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीतर्फे जळगाव शहर काजी व मस्जिद उमरचे इमाम मुफ्ती अतिकुर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा पत्रकार संघात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

 

या व्याख्यानमालेत इस्लाम धर्म व त्यावर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांनी प्रत्यक्षात आचरण करून दाखवलेले चरित्र यांचा ताळमेळ म्हणजेच इस्लाम धर्म होय. इस्लाम धर्मात आतंकवाद, धर्मपरिवर्तन व लव जिहादला थारा नसल्याचे मत इस्लाम धर्माचे मराठीचे गाढे अभ्यासक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर व डॉ. इक्राम काटेवाला यांनी मांडले. तर इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार आपले जीवन व्यतीत करून दाखविले त्याबाबत डॉ इक्राम खान हे बोलत होते.

डॉ. इक्राम खान यांनी आपल्या व्याख्यानामध्ये अंतीम प्रेषितांचे ६२ वर्षाची जीवनगाथा सादर केली. डॉ. रफिक पारनेरकर यांनी इस्लाम धर्मात जबरदस्तीने धर्मांतरणास सक्त मनाई केलेली आहे. धर्मांतरण म्हणजे भाषांतर, वेषांतर किंवा नामांतर नसून ते आपल्या विचारांचा व आचारांचा बदल करून काय खरे आहे व काय चांगले आहे त्याचा निर्णय घेऊन केलेले कार्य म्हणजे धर्मांतरण होय. धर्मांतरण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून तो निर्णय व्यक्तिशः घेऊ शकतो असे मत मांडले. तसेच इस्लाम धर्मात लव जिहाद ला सुद्धा थारा नसल्याचे त्यांनी उदाहरणांस स्पष्ट केले. आतंकवाद बाबत बोलताना पारनेरकर यांनी जो धर्म पवित्र कुराणातच्या माध्यमाने शिकवण देतो की ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली. प्रेषित एका यहूद्याची अंतयात्रा जात असताना सन्मानाने उभे राहून त्यांना सन्मान देता म्हणजे जे प्रेषित एका मृतात्म्यास सन्मान देतो. त्या व्यक्तीची शिकवण जिवंत माणसाचा जीवे मारण्याची असु शकते का? असा प्रश्न उपस्थित करून आतंकवादला इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारचा थारा नाही हे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात मुफ्ती अतिकउर रहमान यांनी अंतिम प्रेषितांनी पवित्र कुराणावर आधारित आपले चरित्र ६२ वर्षा च्या वया पर्यंत अप्रत्यक्षरीत्या व्यतीत करून दाखवले. त्यानुसारच प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात ही तत्वे अंगिकारले असता तेच खरे समाज हितचिंतक असून ईश्वर त्यांना त्यांच्या चांगल्या कर्माचे फळ निश्चित देईल व प्रत्येक समाजात सुसंवाद द्वारेच आपसातील गैरसमज दूर होतील असे मत मुफ्ती अतिकउर रहमान यांनी मांडले.

या व्याख्यानमालेचे औपचारिक व अत्यंत वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती हे पुस्तक जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे ,क्रीडाशिक्षक संजय पाटील, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे व आंतरराष्ट्रीय खेळाडू योगेश्वर धांडे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख अतिथी च्या हस्ते पुस्तक देऊन या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक मानियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी आपल्या प्रास्ताविक केले. प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे भाऊसाहेब पाटील, ज्येष्ठ उर्दू पत्रकार अली अंजुम रिजवी, महिला सुरक्षा समिती सदस्या निवेदिता ताठे आदींनी प्रश्न विचारले असता त्यांचे समाधानकारक उत्तरे डॉ. रफिक पारनेरकर डॉक्टर इकराम खान यांनी दिले.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
वकील संघाचे अॅड. दिलीप बोरसे, दिलीप चौधरी, डी के पाटील, मिलिंद केदार, निवेदिता ताठे, दिनेश पाटील, सौरभ कुलकर्णी ,अनंत देशमुख, संजय पाटील, प्रवीण ठाकरे, वाल्मीक पाटील, कौस्तुभ शिंदे, हिरालाल बडगुजर, अरुण सपकाळे, सचिन धांडे, जवाहर देशमुख, मनोज व्यास, डॉक्टर यश बोंडे, दिनेश पाटील, शैलेंद्र पाटील, हेमराज चव्हाण, जमात ए इस्लामी चे समी सहाब, सोयल आमिर, प्रोफेसर डॉक्टर एम इक्बाल, कुल जमातीचे सय्यद चांद, ताहेर शेख, मुजाहिद खान,अखतर शेख, वहिदत चे अतीक शेख, सत्य प्रचार चे कादर शेख, मुस्तफा शेख, वहीद सय्यद, फहिम पटेल, अश्फाक पिंजारी, कामिल शेख, मुस्ताक करिमी, अन्वर खान, अझीझ शिकलकर, पंडित जाधव ,सय्यद मुमताज अली, रफीकउद्दीन शेख ,सोहेल ताहेर ,सलाउद्दीन नदीब,रईस बागवान, सईद पटेल, उमर फारूक, कयूम असर, आसिफ खान, अनिस शाह, शेखु शेख,रईस बागवान,अल्ताफ शेख आदींची उपस्थिती होती

 

Exit mobile version