Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इस्रायलकडून भारत आकाशनेत्र विमाने घेणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था ।चीन आणि पाकिस्तानकडून सतत वाढत जाणारा धोका लक्षात घेत भारत लवकरच ‘आकाश नेत्र’ खरेदी करण्याचे पाऊल उचलत आहे. भारताविरोधात दोन आघाड्यांवर कारवाया करण्याची तयारी करणाऱ्या शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवली जाणे शक्य होणार आहे. संरक्षण मंत्रालय लवकरच इस्रायलसशी करण्यात येत असलेल्या कराराला अंतिम स्वरुप देण्याची शक्यता आहे.

इस्रायल भारताला दोन फाल्कन एअरबॉर्न अॅण्ड कंट्रोल सिस्टमचा (एवॅक्स) पुरवठा करेल. या पूर्वी देखील या कराराच्या किंमतीबाबत भारत आणि इस्रायलदरम्यान अनेकदा चर्चा झालेली आहे. मात्र, दोन्ही बाजूंकडील धोका लक्षात घेता या कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने भारतावर दबाव वाढत चालला आहे.

इस्रायलच्या फाल्कन एवॅक्सला रशियाच्या इल्यूसीन-७६ हॅवी लिफ्ट एअरक्राफ्टवर बसवण्यात येणार आहे. या कराराबाबत आंतरमंत्रालयीन समितीत चर्चा झालेली आहे. प्रस्ताव मंत्रिमंडळ समितीपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

भारतीय हवाईदलाकडे सध्या तीन फाल्कन एवॅक्स आहेत. हे एवॅक्स हवाईदलात सन २००९ ते सन २०११ दरम्यान दाखल झालेले आहेत. माहितीनुसार, इस्रायलकडून खरेदी करण्यात येत असलेली नवी एवॅक्स भारताकडे आधीपासून असलेल्या एवॅक्सपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. यांद्वारे अधिक अंतरापर्यंत अनेक प्रकारच्या फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर नजर ठेवली जाऊ शकणार आहे.

लडाखसारख्या उंचीवरील भागांमधील संभाव्य कारवाईसाठी भारताने अनेक शस्त्रांस्त्रांची निवड केली आहे. यात हलक्या वजनाचे टँक देखील आहेत. चीनने सीमेवर आधीपासूनच हलक्या वजनाचे टँक तैनात केलेले आहेत. आता भारत रशियात तयार झालेले टँक खरेदी करण्याच्या विचारात आहे. या टँकमध्ये 125 MM ची बंदूक आहे. ही कोणत्याही हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरद्वारे कोणत्याही उंचीवरील भागात तैनात केली जाऊ शकते.

Exit mobile version