Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इस्कॉन मंदिरात चंदन यात्रा महोत्सव साजरा

फैजपूर, प्रतिनिधी । येथील इस्कॉन मंदिर येथे सालाबादाप्रमाणे चंदन यात्रा महोत्सव आयोजित केला गेला. अक्षय्य तृतीय ते जेष्ठ कृष्ण अष्टमी तिथी पर्यंत २१ दिवस हा उत्सव साजरा होतो. जो वैष्णव भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा कालावधी असतो.

भक्तीच्या विभिन्न अंगांमध्ये भगवंतांच्या शरीरावर चंदनासहित अन्य सुगंधित लेप लावणे समाविष्ट आहे. या दिवसांत समस्त वैष्णव भक्त आपले आराध्य भगवान श्रीकृष्णांच्या संपूर्ण शरीरावर चंदनाचा लेप लावतात. वैशाख महिन्यात वातावरणात खुप उष्णता असते. म्हणूनच चंदनाचा लेप लावून भगवंतांना शीतलता प्रदान केली जाते. भगवान श्रीकृष्ण सृष्टीच्या कणा कणांत विद्यमान आहेत. म्हणून जेव्हा भगवंताला चंदनाचा लेप लावून शीतलता प्रदान केली जाते तेव्हा त्याच्या प्रभावाने प्रत्येक जीव शीतलतेचा अनुभव करतो. अशी मान्यता आहे की, भगवान जगन्नाथांनी स्वतः राजा इंद्रद्युम्नला आदेश दिला होता की वैशाख महिन्यात चंदन महोत्सव साजरा केला जावा. वृंदावनातील सर्व मंदिरांमध्ये भगवंतांच्या विग्रहाला चंदन लेप लावून सजवले जाते. दर वर्षी भव्य रीतीने साजरा होणारा हा उत्सव यावर्षी लॉक डाउनमुळे मंदिरापूरता मर्यादित रीतीने साजरा करण्यात आला अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष श्रीमान माधव प्रभू यांनी दिली.

Exit mobile version