Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इराणच्या अणुशास्त्रज्ञाची दहशतवाद्यांकडून हत्या

तेहरान : वृत्तसंस्था । इराणचे टॉपचे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. इराणमध्ये खळबळ माजली आहे.

तेहरानजवळ मोहसीन फखरीजादेह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ मोहम्मद यांनी या हत्येची तीव्र शब्दांमध्ये निंदा केली आहे. इराणमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करण्यात फखरीजादेह यांचा मोठा वाटा होता.

मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातला तणाव वाढला आहे. तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा असा विश्वास आहे की इराणच्या गुप्त अण्वस्त्र शस्त्रांच्या मोहिमेबाबत कायमच मोहसीन फखरीजादेह होते. परराष्ट्र मुत्सदी मोहसीन फखरीजादेह यांना इराणी अणुबॉम्बचे जनकही मानतात. आपला आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचं इराणने कायमच सांगितलं आहे. २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत इराणच्या चार अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली. यासाठी इराणने इस्रायलला दोषी ठरवलं आहे.

फखरीजादेह २००३ पासून इराणच्या गुप्त अणुबॉम्बची निर्मिती मोहिमेचं नेतृत्त्व करत होते. मात्र इराणने कायमच आण्विक हत्यारे बनवण्याच्या आरोपाचे खंडन केलं आहे. इराण लष्कराचे कमांडार हिसैन देहघन यांनी ट्विट करत फखरीजादेह यांच्या हत्येचा मोठा बदला घेतला जाईल असा इशारा दिला आहे.

Exit mobile version