Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धर्माची बदनामी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इन्स्टाग्रामवर एका धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी करून धार्मीक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनिवारी १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा २४ वर्षीय तरूणाला ३० सप्टेंबर रोजी रात्री त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर एका धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याबाबतची लिंक आली होती. तरूणाने इन्स्टाग्राम आयडी चेक केले असता बनावट खाते असल्याचे निदर्शनास आले. तरूणाने शनिवारी १ ऑक्टोबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एखाद्या विशीष्ट धर्माच्या सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी अनोळखी इन्स्टाग्राम खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

 

Exit mobile version