Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

 

पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

Exit mobile version