Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इच्छापूर उपक्रेद्रांत नवीन ५ केव्ही ट्रान्सफार्मर मागविण्यात यावे; शिवसेनेचे निवेदन

मुक्ताईनगर –  लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील इच्छापूर उपक्रेंद्रात अतिरिक्त भार असल्याने नव्याने ५ केव्ही मागविण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महावितरण विभागाला देण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा, इच्छापूर, निमखेडी बु. , महालखेडा, टाकळी, चिंचखेडा बु., वायला , नांदवेल परिसरातील शेत शिवार व गावठाण साठी विद्युत पुरवठा करणाऱ्या मौजे इच्छापूर येथील १३२ केव्ही उपकेंद्रांत ५ केव्ही ट्रान्सफार्मर असूनही सदरील ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त भार येत असल्याने अवघ्या १० मिनिटात विद्युत पुरवठा ट्रिप होणे व  खंडित होण्याचे प्रकार वाढलेले आहे.   यामुळे शेत शिवारातील कृषी पंप जळणे, रोहित्र जळणे हा प्रकार नित्याचाच झालेला आहे. अश्यामुळे शेती पिकांना पाणी भरणा होत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे येथे तात्काळ नवीन ५ केव्ही ट्रान्सफार्मर मिळावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले.

 

प्रसंगी इच्छापुर सरपंच गणेश पाटील, चारठाणा सरपंच सूर्यकांत पाटील, महालखेडा सरपंच प्रमोद कोळी, गणेश सोनवणे (निमखेडी बु)  यांचेसह किशोर पाटील(महालखेडा), अमोल येणकर, शिवाजी भडांगे, प्रमोद सोनार (निमखेडी) यांचेसह टाकळी, चिचखेडा बु, नांदवेल येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आमदारांनी लागलीच घेतली दखल

आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत  महावितरण च्या अधिकाऱ्यांना निवेदन कर्त्यांसमोर लागलीच 5 केव्ही च्या ट्रान्सफार्मर चे इस्टीमेट तयार करून प्रस्ताव जिल्हा नियोजन कडे सादर करण्याच्या सूचना केल्या. व पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचाली गतिमान केल्या.

Exit mobile version