Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इच्छापुर ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थ अंधारात

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । पाणीपुरवठा योजनेची थकबाकी ग्रामपंचायत भरत नसल्याने महावितरण इच्छापूर गावात वाढीव  खांबांवर तारा टाकत नाही म्हणून ग्रामस्थांना मजबुरीने अंधारात राहावे लागत आहे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील ढोले यांनी ही वस्तुस्थिती मांडणारा आरोप ग्रामपंचायतीवर करताना पुढे म्हटले आहे की , इच्छापुर गावासाठी 2 डी पी आहेत एक कमी आणि दुसरी जास्त क्षमतेची आहे एका डीपीवर लोड जास्त असल्यामुळे त्या डीपीवरील फ्यूज सातत्याने जात असतो. 

एका डीपी वरील लोड कमी करण्यासाठी 2 पोल वर तारांची गरज आहे, माजी सरपंच कोकीलाबाई धात्रक यांच्या कारकिर्दीमध्ये पोल टाकले आहेत पण त्यासाठी लागणारे तार कुऱ्हा महावितरण कार्यालय  इच्छापुर ग्रामपंचायतीला देत नाही इच्छापुर ग्रामपंचायतीकडे  पाणी पुरवठा योजनेचे  70,000/- हजार रुपयांच्या जवळपास थकबाकी आहे हे बिल 15 व्या वित्त आयोगाच्या  निधीमधून भरायचे आहे, पैसा शिल्लक असूनसुद्धा ग्रामस्थांना अंधारात ठेवण्याचे नेमके कारण  इच्छापूरच्या ग्रामपंचायतीने स्पष्ट करावे असा  ग्रामस्थांचा आग्रह असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील ढोले यांनी म्हटले आहे या प्रश्नावर राजकारण करणारांचाही निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे

 

Exit mobile version