Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इच्छादेवी पोलीस चौक आवारात वृक्षारोपण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील इच्छा देवी पोलीस चौक आवारात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते सोमवार ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वृक्षारोपण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी इच्छादेवी पोलीस चौकीची नूतन इमारत उभारण्यात आली आहे. या परिसरात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 15 विविध रूपांची लागवड पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, सचिन पाटील , किशोर पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version