Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इको-फ्रेंडली चिमणी घरट्याचे वाण, अभिनव उपक्रमाचे स्वागत (व्हिडिओ )

 

खामगाव  अमोल सराफ । पारंपारिक पद्धतीने सर्वत्र मकर संक्रात साजरा केला जात असतांना खामगाव येथील महिला मागील सात वर्षापासून इको फ्रेंडली मकर संक्रात साजरा करीत आहेत. यावर्षी त्यांनी संक्रातीला चिमणी घरटेचे वाण म्हणून देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपण इको फ्रेंडली होळी उत्सव, पर्यावरण पूरक गणपती उत्सव त्यामध्ये तयार होणाऱ्या मुर्त्या याबाबत ऐकले असेल पण बुलढाणातील खामगाव येथील महिला भगिनींनी एकत्र येऊन इको-फ्रेंडली संक्रांत साजरा करण्याचा अनोखा उपक्रम मागील सात वर्षांपासून राबवित आहे. याबाबत थेट लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन कसा असतो हा इको फ्रेंडली मकर संक्रांतीचा उपक्रम याची माहिती घेतली. या महिला भगिनींचा आलेल्या प्रतिक्रियांमधून या अभिनव उपक्रमांमध्ये मकरसंक्रांत सणाच्या पर्वावर ईको फ्रेण्डली चिमणी घरटे वाण देवून पर्यावरण रक्षणासाठी उपक्रमात सुवासिनींचा पुढाकार होता. यामध्ये सौ. मंगला गुरव,सौ. शोभा भोपळे, सौ. मनिषा ठाकूर, सौ. पूजा गोयल, सौ. मनिषा भोपळे, सौ.सोनिया जोशी, कु.राशी बरगे, कु.मनवा जोशी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित सुवासिनींना चिमणी घरटे देवून सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम कलाध्यापक संजय गुरव यांचा संकल्पनेतुन साकारला गेला.

 

 

Exit mobile version