इंधन दरवाढ : मोदी सरकार नफेखोरी करत आहे ; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढवून नफेखोरी करत आहे. असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत एक व्हिडीओ ट्विट करुन त्यांनी ही मागणी केली आहे.

 

या व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले आहे, की कोरोना, बेरोजगारी, आर्थिक संकट आपल्या समोर येऊन ठेपली आहेत. या तीन संकटांमुळे सगळ्याच लोकांना फटका बसला असून गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, मजूर, शेतकरी या सगळ्यांनेच नुकसान झाले आहे. लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ठोस तरतूद करा, त्यांना एक पॅकेज देण्याची गरज आहे असेही सुचवले होते. मात्र सरकारने हा सल्ला ऐकला नाही. आता न्याय योजनेची तरतूद करा असेही आम्ही केंद्र सरकारला सुचवले असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

Protected Content