इंधनाच्या दरात पुन्हा वाढ

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यातील पेट्रोल -डिझेल दरात आज शनिवारी पुन्हा वाढ झाली. इंधनाच्या दरात किमान प्रती लिटर ०.८० ते ०.८४ पैशांनी हि दरवाढ झाली आहे. सद्यस्थितीत जळगावात डीझेलचे दर  ९६.५३ तर पेट्रोल ११३.८१ रुपये प्रती लिटरवर पोचले आहेत.

जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या तीन चार महिन्यापूर्वी पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झाला नव्हता. नोव्हेंबर २०२१ च्या पहिल्या सप्ताहात इंधन दरात वाढ झाली होती. त्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर काहीसे स्थिर होते. मात्र २२ मार्च २०२२ रोजी पेट्रोल-डिझेल दरात प्रति लिटर ८० पैसे, २३ मार्च रोजी ८० पैसे वाढ झाली होती. २४ मार्च रोजी दरात कोणतीही वाढ झाली नाही. परंतु २५ रोजी पुन्हा ८० पैशांनी इंधनाचा दर वाढला. आज शनिवारी पुन्हा त्यात ८० पैशांची वाढ झाली होती. जळगाव शहरात गेल्या सप्ताहात पेट्रोल १११.२९ तर डीझेल ९४.०२ रुपये प्रतिलिटर होते, तर आजचे दर पेट्रोल ११३.८१ तर डीझेल ९६.५३ रुपये प्रती लिटर आहेत.

या आठवड्यातील चार ते पाच दिवसांत हि इंधन दरवाढ झाली आहे. परकीय देशातून क्रुडऑइलची आयात भारतात केली जाते. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशादरम्यान गेल्या २९ दिवसापासून सुरु असलेल्या युध्दामुळे जागतिक बाजारात गेल्या काही काळात क्रूड तेलाच्या दारात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी इंधन दरवाढ तेल कंपन्यांकडून केली जात आहे. आगामी काळात देखील इंधन दरवाढ कायम राहण्याचे संकेत दिसून येत आहेत. पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर ८० पैशांनी वाढ झाल्यामुळे चार दिवसांत मोठ्या शहरात पेट्रोल आणि डिझेल ३.२० रुपयांनी महागले आहे.

 

 

Protected Content