Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंद्रायणी नगरातून तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील आव्हाने शिवारातील इंद्रायणी नगरातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नितीन राजेंद्र सोनवणे (वय 32 रा. इंद्रायणी नगर, सत्यम पार्क आव्हाने शिवार, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २० मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १२ सीके ४८०९) ही घरासमोर पार्किंगला लावलेली होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता, त्यांना दुचाकी मिळाली नाही. अखेर मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील करीत आहे.

Exit mobile version