Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रामाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली या विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी Online www.ignou.ac.in या संकेतस्थळावर इच्छुकांनी प्रवेश घ्यावा. ज्या उमेदवारांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे व पत्र व्यवहाराद्वारे आपली नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून पदवीधर होण्याची इच्छा आहे. जे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षा नापास किंवा शिक्षण अपूर्ण आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी पदवी व पूर्व तयारी वर्ग (बी.पी.पी.) हा सहा महिन्याचा कोर्स करून बी.ए., बी.कॉम., बी.एस.डब्ल्यू.ख्‍ व बी.टी.एस. या कोर्सच्या कोणत्याही एका पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेशित होवू शकतात.

अशा उमेदवारांसाठी संगणकशास्त्र विषयात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲपलीकेशन (बी.सी.ए.), मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲपलीकेशन (एम.सी.ए.), बॅचलर ऑफ टुरीझम स्टडीज (बी.टी.एस.), मास्टर टुरीझम स्टडीज (एम.टी.एस.), बी.ए.,बी.कॉम.,बी.लिब. (बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स), एम.लीब. (मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स), एम.ए. (अर्थशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी, लोकप्रशासन), बी.एस.सी.(नर्सींग), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रूरल डेव्हलपमेंट, एम.ए.(रूरल डेव्हलपमेंट), एम.एस.डब्ल्यू. तसेच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शिक्षणाचे माध्यम हिंदी व इंग्रजी असून इच्छुक उमेदवारांनी www.ignou.ac.in या संकेत स्थळावर प्रवेश घ्यावा.

अधिक माहितीसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र द्वारा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पहिला मजला ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी भवन, जळगाव येथे दुपारी ४ ते ६.३० व रविवारी सकाळी ९.३० ते २ वाजेपर्यंत या वेळेत. ३१ जुलै, २०२० पूर्वी संपर्क साधावा असे समन्वयक डॉ. ए.बी. चौधरी यांनी कळविले आहे.

Exit mobile version