Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर सावित्रीबाई फुले यांची बदनामी करण्यात आली असून या संकेतस्थळावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन समता परिषदेतर्फे पोलिसांना देण्यात आले आहे.

 

शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. या वेबसाईटवरील लेखामध्ये  सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा तीव्र निषेध करत संबधितांवर कठोर कारवाई करण्याच्या आशयाचे निवेदन अ.भा महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमळनेर चे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना देण्यात आले.

 

‘इंडिक टेल्स’ या या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणार्‍या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

यावेळी तालुकाध्यक्ष अमोल माळी,शहराध्यक्ष प्रताप पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन,माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, शिवसेनेचे संघटक साखरलाल महाजन, संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील,भास्कर महाजन,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परीषदेचे सोमचंद संदानशिव, पंकज चौधरी,विठ्ठल पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील आदि उपस्थित होते.

Exit mobile version