Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंटास फार्माच्या प्लाझ्मा थेरपी लसीची महिनाभरात चाचणी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे. महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिनला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.

ही लस मानवी प्लाझ्मापासूनच तयार झाली आहे. त्यामुळे याचे निकाल महिन्याभराच्या आतच समोर येतील. या लसीसाठी प्रमाणपत्र घेणं आणि त्याच्या उत्पादनाच्या पूर्ण प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं डॉ. चतुर्वेदी म्हणाले.

Exit mobile version