Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यास रोजगाराच्या अधिक संधी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातिल इंग्रजी विभागाकडून आजी-माजी विद्यार्थिनिंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात इंग्रजी विभागाच्या एकूण ३५ आजी-माजी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

 

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्रा.भालचंद्र सावखेडकर होते.या प्रसंगी माजी प्रा. प्रवीण पाटील मंचावर उपस्थित होते. माजी विद्यार्थीनी व राजभवन मुंबई येथे उच्च श्रेणी लघु लेखक (इंग्लिश) या पदावर  शिक्षण विभाग येथे कार्यरत असलेल्या  चारुशीला पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी मातृभाषा व इंग्रजी  भाषेवर प्रभुत्व असल्यास रोजगाराच्या कोणत्या संधी आज उपलब्ध आहे यावर मार्गदर्शन केले. त्या प्रमुख वक्त्या म्ह्णून उपस्थित होत्या. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्या मातृभाषेवरही प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. मातृभाषा शुद्ध पद्धतीने बोलता यायला पाहिजे. जी भाषा आपल्याला अवगत करायची आहे त्या भाषेचे पैलू समजून घ्या त्यासाठी वाचनावर भर द्या असेही चारुशीला पाटील यांनी सांगितले.

 

मेळाव्याच्या उद्देश आजी माजी विद्यार्थीनी कुठे आहेत. त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे याची माहिती व्हावी म्हणून आयोजन करण्यात आले होते. सूत्र संचालन प्रतीक्षा पाटील आणि प्रगती बारी या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सविता नंदनवार यांनी केले. मेळावा आयोजना करीता प्राचार्य गौरी राणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.जे पाटील, उपप्राचार्य प्रा.तायडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.योगिता सोनवणे, प्रा.नयना पाटील, प्रा.पूजा टाक इंग्रजी विभागातील प्राध्यापकांनी सहकार्य केले.

Exit mobile version