Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ.‍शिरीष चौधरी यांनी खा. राहूल गांधी यांना दिली पहिल्या ग्रामीण अधिवेशनाची स्मरणीका भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी दिला 1936 च्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षा च्या यावल तालम तालुक्यातील फैजपुर येथे झालेल्या पहिल्या काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा देत आमदार शिरीष चौधरी यांनी स्मरणीका भेट दिली.

भारत जोडो पदयात्रेत २० नोव्हेंबर रोजी सकाळी पदयात्रेत खा.राहुल गांधी व रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची भेट झाली, यावेळी पदयात्रेत गांधी सोबत चालतांना त्यांना फैजपुर अधिवेशन, त्याची तयारी, त्यात संमत केलेले ठराव व त्यांच्या महत्वाची माहीती देणारी पुस्तिका भेट म्हणुन दिली. १९३६ ला पंडित नेहरू जी व १९८८ ला फैजपुर कांग्रेसच्या सुवर्ण महोत्सवा प्रसंगी देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीनी प्रज्वलित केलेली ध्वजज्योती त्यांनी आता पुनः प्रज्वलित करावी अशी विनंती आमदार चौधरी यांनी केली.

१९३६ च्या अधिवेशात स्व. धनाजी नाना चौधरी यांनी नियोजनबध्द आयोजन केले होते. पू.. साने गुरूजींनी मुंबई पासुन पायी चालत फैजपुर ला ध्वजज्योती आणली होती. ती ज्योत म्हणजे राष्ट्रसेवेचे प्रतिक होती. अधिवेशनाचे उद्घाटन पंडित जवाहर लाल नेहरूंनी ध्वजज्योत प्रज्वलित करून केले. राष्ट्रसेवेची भावना स्वतः महात्मा गाँधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी ग्रामीण भागातल्या हजारो लोकांच्या मनात जागृत केली.

पुढे १९८८ मध्ये लोकसेवक मधुकरराव चौधरी ह्यांच्या कल्पनेतून फैजपुर येथे १९३६ च्या अधिवेशनच्या सुवर्णमहोत्सवानिमीत्त तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि पत्नी श्रीमती सोनिया गांधी ह्यांच्या उपस्थितीत फैजपुर येथे पुनः ध्वजज्योती प्रज्वलित करून तेथे असलेले छत्रपति शिवाजी महाराज महाद्वार व प्रेरणास्तंभाचे लोकार्पण केले. आणि आता त्याच परंपरेचे पाईक खा. राहुल गांधींनी आपला भारत देश पुनः चि एकदा जोडण्याच्या, हिंसा-अधर्म नष्ट करण्याच्या, तानाशाही व मनमानी राज्यकारभार संपुष्टित आणण्याच्या व सामान्य- गोर गरीब जनेला न्याय मिळवुन देण्याच्या निर्धाराने ती ज्योत प्रज्वलित करून जनतेच मन जागृत करायला पुढील प्रवासाला प्रारंभ केला. मी आपल्या रावेर यावल विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधि आणि एक राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणुन मी ते अधिवेशन घडवुन आणणाऱ्या सर्व महात्म्याना अभिवादन करतो. आम्हा सर्वाना राहुल गांधींचा अभिमान आहे, त्यांच्या नेतृत्वात ह्या गांधीवादी विचारधारेला अधिक बळ मिळो व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला सक्रिय राजकारणात जनेसेवची संधी मिळो ह्याच शुभेच्छा आ . शिरीष चौधरी यांनी दिल्या आहे .

Exit mobile version