Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. शिरीष चौधरींच्या उपस्थितीत तालुका दक्षता समितीची पहीली बैठक उत्साहात

यावल, प्रतिनिधी I येथे तालुका दक्षता समितीची पहीली बैठक यावल- रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात उत्साहात पार पडली.

या बैठकीत नागरीकांना मिळणारे स्वस्त धान्य वितरण, तालुक्यातील महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावलच्या तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत तालुका पातळीवरील दक्षता समितीचे सचिव सदस्य तहसीलदार महेश पवार यांनी समितीचे अध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्यासह समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी सविता अरुण लोखंडे , महेंद्र चौधरी, वैशाली चौधरी , सरफराज तडवी , चंद्रकला इंगळे , भोजराज पाटील , मंजुषा सांळुके, फैजपुर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या दक्षता समितीचे सदस्य प्रिया बेंडाळे , प्रतिभा होले, रामराव मोरे , वसीम तडवी, संजय रल, शेख जफर शेख अजगर , संजय महाजन, यावल नगर परिषद अंतर्गत दक्षता समिती सदस्य सुरेखा शरद कोळी , देवयानी महाजन, अनिल जंजाळे, संतोष खर्चे, रईसाबी खाटीक , निलेश बेलदार आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत तहसीलदार महेश पवार सर्व सदस्यांना पुरवठा विषयक माहीती व दक्षता समिती सदस्यांना त्यांचे कार्य व कर्तव्य संदर्भातील माहीती दिली. या वेळी आमदार शिरीष चौधरी यांनी धान्य दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी ३ तास आणि संध्याकाळी ३ तास उघडावी अशी सुचना दिली. व शिधापत्रीके वरील मयत व्यक्ति किंवा बाहेरगावी गेलेल्या नागरीकांची नांवे कमी करून गरजवंत लोकांची नांवे वाढवुन धान्य साठा सुरू करावा , काळया बाजारात विकले जाणारे धान्यावर लक्ष ठेवुन सदर गाडयांचे फोटो काढुन तहसीलदार यांना तसेच पोलीस निरिक्षक यांना सुचित करावे अशा सुचना निर्देश केल्यात ,या बैठकीचे सुत्रसंचालन पुरवठा अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांनी केले. सदर बैठकीस यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले , तालुका पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमळे, सकावत तडवी , के.एम . पाटील उपस्थित होते.

Exit mobile version