Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. लता सोनवणे यांच्या हस्ते ई -श्रम कार्ड नोंदणी वाटप व सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान संचालित- सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

आज दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील मुख्य चौकात प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी शिबीर (कॅम्प) चेही मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करून सेवेचा प्रारंभ डांभुर्णी गावापासून करण्यात आला. या शिबिराचे उंटावद, चिंचोली, डोणगाव ,कोळन्हवी आडगाव -कासारखेडा ह्या पंचक्रोशीतील गावामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव-संदीप पाटील (सोनवणे) यांनी केले. ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मजूर यांच्यासाठी कसे उपयुक्त आहे याचे उद्दिष्ट काय याबाबतीत स्पष्टीकरण देऊन ग्रामीण भागात असंघटित क्षेत्रात येणाऱ्या मजुरांची विशेषतः ह्या गटात मोडणाऱ्या महिलांची संख्या मोठया प्रमाणात आहे म्हणून ग्रामीण भागात असा उपक्रम जास्त संयुक्तिक ठरतो असे प्रतिपादन केले. ह्या कार्यक्रमात नानासाहेब आर.जी पाटील ,कासारखेडा सरपंच भागवत पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राम पवार, स्वराज्य ग्रुपचे आण्णासाहेब शंभू सोनवणे आणि रामचंद्र चौधरी यांनी मनोगते व्यक्त करून ह्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा देवून शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचयात सदस्य शुभम विसवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन स्वयंदीपचे संचालक शैलेश शिरसाठ व स्वयंदीप शासकीय योजना माहिती व सहकार्य समितीचे सदस्य देवानंद कोळी यांनी केले. दरम्यान आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे तसेच नानासाहेब आर.जी पाटील आणि शिवश्री रामदादा पवार यांच्या हस्ते स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील (सोनवणे) यांचा देखील सत्कार महिला शक्ती केंद्र (जिल्हा स्तरीय महिला समिती)वर नियुक्ती झाल्याबाबद्दल करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित अभ्यासिका व ग्रंथालयास भेट दिली. ह्या कार्यक्रमास शशिकांत पाटील,अनिल साठे,गावच्या सरपंच कल्पना बाविस्कर, प्रतिभा बाविस्कर,नानासाहेब विजय पाटील,विकास (गोटू) सोळुंखे, धनंजय कीर्तने,विलास भंगाळे,किरण पाटील ह्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. तलाठी श्री. बारेला , ग्रामविकास अधिकारी श्री. गोसावी ,पत्रकार मनोज नेवे, गिरिश विसवे आदी उपस्थित होते. यशस्वीतेससाठी स्वयंदीप शासकीय योजना माहिती समिती तसेच कुंदन पुंडलिक कोळी,देवानंद कोळी, उमाकांत पाटील, प्रदीप कोळी व प्रेमचंद भगवान सोनवणे यांनी कामकाज पहिले.

Exit mobile version