Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणाबाई कोविड केअर सेंटरच्या रुग्णांना फळे वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी । कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगाव येथील शासकीय तंत्र निकेतनच्या मुलींच्या वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या विनामूल्य बहिणाबाई कोविड केअर सेंटर येथे कोरोना रुग्णांसाठी फळवाटपाचा कार्यक्रम झाला.

बहिणाबाई कोविड केअर सेंटर येथे कोरोना रुग्णांसाठी फळवाटपाचा कार्यक्रम आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबच्या जिल्हाशाखेतर्फे घेण्यात आला. याप्रसंगी फॅन्स क्लबचे अध्यक्ष प्रभाकर बडगुजर , उपाध्यक्ष रामधन पाटील , उपाध्यक्ष डॉ.देविदास पाटील यांची विशेष उपस्थिती होती. बहिणाबाई कोविड केअर सेंटरचे पदाधिकारी चंदन कोल्हे , तुषार वाघुळदे , प्रवीण चौधरी , मिलिंद चौधरी , पराग महाजन , किरण वाघ , चंद्रकांत नन्नवरे , भगवान मोरे तसेच बुलुंद छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्ष प्रभाकर पवार म्हणाले की , सामाजिक बांधिलकी म्हणून असा समाजाभिमुख उपक्रम आम्ही राबवित आहोत तर बहिणाबाई कोविड केअर सेंटर चे संचालक चंदन कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी कौतुक करत आमदार श्री.पवार यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो अशी प्रार्थना केल. आभार डॉ.देविदास पाटील यांनी मानले.

Exit mobile version