आ. महाजन यांनी साधला मुख्यमंत्र्याच्या कार्यप्रणालीवर निशाणा

रावेर प्रतिनिधी ।  कोरोना व नैसर्गिक संकट राज्यवर असतांना दिड वर्षापासुन घरात बसून असलेले उद्वव ठाकरे कसेल लोकप्रिय मुख्यमंत्री.. त्यांच्या काळात मंत्रालयात ४० हजार फाईल पेंडींग असून त्यांना मंत्रालयाची पायरी चढायला सुध्दा भिती वाटते अशी टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली. 

ओंकारेश्वर( रावेर) येथे भारतीय जनता पार्टीचा समर्थ बूथ अभियान अंतर्गत शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी टीका केली. ते पुढे म्हाणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त एकच काम आहे. पाऊस येत नाही त्याला केंद्र सरकार जबाबदार प्रत्येक वेळी केंद्रावर खापर फोडून राज्यात कोणतेही काम करायचे नाही अशी टीका केली. यावेळी पुढे ते म्हणाले की चाळीगावात एवढे नैसर्गिक संकट आले परंतु अद्याप राज्यसरकारने मदत केली नाही. तेथील भाजपाचे आ. मंगेश चव्हाण यांनी जवळून जेसीपी पॉकल्यान आणून कन्नड घाट साफ करताय. शासनाने अद्याप डिझेलचे सुध्दा पैसे दिले नसून निव्वळ घोषणा देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार रक्षा खडसे,  भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष ना. रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, नंदा पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, अजय भोळे, पंचायत समिती सभापती कविता कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनिल पाटील, अमोल पाटील शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थिती होते.

 

 

 

 

Protected Content