Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील सावरखेडे व वेल्हाणे खु. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान‌ जिल्हा बँकेसाठी बिनविरोध झाल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील सावरखेडे व वेल्हाणे खु. येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून सत्कार करण्यात आला. दरम्यान तालुक्यातील वेल्हाणे खु. येथे २५१५ अंतर्गत गावात ३ हायमास्ट – ८.५५ लक्ष, जि.प.शाळा आवारात पेव्हर ब्लाॕक बसविणे – १० लक्ष, रस्ता काँक्रीटीकरण करणे – ३ लक्ष, दहणभुमिची सुधारणा करणे – ३ लक्ष व आमदार निधी अंतर्गत २.५५ लक्ष रूपयाचा १ हायमास्ट तर तालुक्यातील
मौजे सावरखेडे येथे दलित वस्ती अंतर्गत २.५५ लक्ष किमतीचा १ हायमास्ट, आमदार निधी अंतर्गत भिल्ल वस्तीत मारोती मंदीराजवळ सभामंडप बांधणे -१० लक्ष,
गावांतर्गत १ हायमास्ट – २.५५ लक्ष, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत वेल्हाणे ते करमाड कि.मी.०/००० ते ३/२४० पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे – २ कोटी ५६ लाख रूपये आदी मंजुरी मिळाली आहे. या सर्व विकासकामांचे भूमिपूजन आज आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी ते नागरीकांना संबोधित करतांना, या मंजुर कामांसह आपल्या गावातील उर्वरीत कामे प्राधान्याने पुर्ण करण्याचा मानस आहे. तसेच सरकार आपले असल्याने गावातील एकही मुलभुत सुविधेची व इतर कामे प्रलंबित राहु देणार नाही. असे विधान केले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील , जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, जि.प.सदस्य रोहीदास पाटील, बाजार समिती उपसभापती दगडु पाटील, संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, पांडुनाना पाटील, मा.सरपंच राजु पाटील, शेतकी संघ व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, डाॕ.राजेंद्र पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, वेल्हाणे येथील राजेंद्र पाटील, शिवरे येथील पंढरीनाथ पाटील, तरवाडे सरपंच सुमित पाटील, बोळे येथील साहेबराव गिरासे, ढोली येथील यशवंत पाटील, राजेंद्र पाटील, बोळे ढोली सावरखेडे वेल्हाणे तरवाडे शिवरे येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो संचालक मंडळ, स्थानिक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version