Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. गिरीश महाजन यांनी केली वैद्यकीय रूग्णालयाची पाहणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी पाहणी केली.

कोरोना संदर्भातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्या काय उपाययोजना असू शकतात या संदर्भात आढावा आमदार गिरीश महाजन व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे डिन भास्कर खैरे यांनी आज वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये २० बेडचे व्हेंटिलेटर वार्ड त तात्काळ सुरू करण्याच्या सुचना आमदार गिरीशभाऊ यांनी दिल्या. जिल्हाभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करण्यात येईल याची चर्चा यावेळी झाली. या यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर भास्कर खैरे यांनी माहिती दिली. वैद्यकीय महाविद्यालयात गरुडा तपासणी वाढ सुरू करण्यात आलेला आहे २० खाटांचा अद्ययावत वॉर्ड तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी आज एक करूनच संशयित रुग्ण दाखल करून घेण्यात आलेला आहे. त्याच बरोबर कोरोना रुग्णांसाठी जळगाव जिल्ह्यातील येणार्‍या स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात आला असून त्याठिकाणी आज जवळजवळ दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येणार्‍या करुणा रुग्णांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व जूनियर्स डॉक्टर्सना ट्रेनिंग देण्यात आलेला आहे त्यांना ट्रीटमेंट प्रोटोकॉल समजावून सांगण्यात आलेले आहेत. आणि डॉक्टर आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याबाबतीत त्यांना माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version