आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते नवीन १३ घंटा गाड्यांचे लोकार्पण (व्हिडिओ)

जामनेर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जामनेर नगरपालिका नेहमी तत्पर असून यामध्ये आता नवीन घंटागाड्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडणार. आपण सर्वांनी ओला व कचरा वेगळा टाकावा व शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन घंटागाड्या लोकार्पण प्रसंगी बोलताना आ. गिरीश महाजन यांनी दिली.

 

जामनेर नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियान बक्षीस निधीच्या माध्यमातून नगरपालिकेने सुमारे अडीच कोटी निधी खर्च करून तेरा घंटागाड्या व एक ट्रॅक्‍टर खरेदी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते घंटागाड्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, नगर पालिका गटनेते डॉ. प्रशांत धोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, महेंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, अनिस शेख, भगवान सोनवणे, उल्हास पाटील, कैलास नरवाडे, पुखराज डागी, नवल पाटील, नगरपालिका, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे, सुरज पाटील, साहेब गजानन पाटील यांच्यासह नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आमदार गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, जामनेर शहरात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून शहरातील सर्व रस्ते गटारी शौचालय यांच्यासह विकास कामे झाली असून पुढे नगरपालिकेच्या माध्यमातून ते प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती घंटागाड्या लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार महाजन यांनी दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/342023934688924

Protected Content