जामनेर, भानुदास चव्हाण | गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचारी संप करून दुखवटा चालू केला आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात असून एक हात मदतीचा या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतर्फे जवळपास साडेतीनशे कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
किराणा किट वाटप कार्यक्रमात बोलताना भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले की, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणार असून ज्या काही मदत लागली तर भाजपा पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहन केले. भारतीय जनता पार्टी व आमदार गिरीश महाजन यांच्यातर्फे जामनेर आगारातील संपकरी व दुखत सामील असलेल्या साडेतीनशे एसटी कर्मचाऱ्यांना एक हात मदतीचा माध्यमातून किराणा कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर. जि. प. सदस्य अमित देशमुख, जे. के. चव्हाण, विलास पाटील, पंचायत समिती सदस्य गोपाल नाईक, सुरेश बोरसे, कमलाकर पाटील, नपा उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, कैलास नरवाडे, शेख अनिस नदीम, भगवान सोनवणे, नाना वाणी, नवल पाटील, दीपक तायडे, विनोद पाटील, रमेश नाईक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व एसटी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले की, आघाडी सरकार हे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत नसून कारण त्यांचा भ्रष्टाचार त्यांना करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालेल तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/655486225804754