Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते ‘कोविशील्ड’ लसीकरणाचा शुभारंभ

 

खामगाव, प्रतिनिधी । येथील सामान्य रुग्णालय येथे आ. अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते कोरोना महामारी प्रतिबंधक बहुप्रतीक्षित ‘कोविशील्ड’ लसीचा शुभारंभ करण्यात आला.

बुलडाणा जिल्ह्यात ६ केंद्रावर कोरोना प्रतिबंध लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेस फीत कापून सुरवात करण्यात आली. त्यानंतर आ अॅड. फुंडकर यांनी लसीकरण विभागाची संपुर्ण माहिती घेऊन पाहणी केली. सर्वप्रथम सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी लस टोचून घेतली. त्यानंतर इतर कोरोना योद्धांचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात आज २०० कोरोना योद्ध्यांना
कोरोना महारोगावर प्रभावी कोविशील्ड लस देण्यात येणार आहे. तर कोरोना योद्ध्यांना १८ जानेवारी ग्राम पंचायत निवडणूक मतमोजणी नंतर लस देण्यात येणार आहे.

लस घेतल्यानंतर दुसरी लस २८ दिवसानंतर देण्यात येणार असून याबाबत माहिती त्यांच्या मोबाईलवर संदेशद्वारे मिळणार आले. आजच्या या कार्यक्रमात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्यासह तहसीलदार शीतल रसाळ, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. बी. वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा, डॉ. राहुल खंडारे, डॉ. गुलाब पवार, डॉ. राजाभाऊ क्षिरसागर, डॉ. सुरेखा खर्चे, डॉ. विलास चरखे, डॉ. संजीत संत, डॉ. ज्ञानेश्वर वायाळ, डॉ. सुरेखा खडचे, डॉ. दिनकर खिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, सुमित्रा राऊत, विठ्ठल पवार, गणेश देशमुख, रमेश अवचार, मुख्य औषध अधिकारी श्रीधर जाधव, शिवदास वाघमोडे, लसीकरण विभागाचे हर्षल गायकवाड, सुमन म्हात्रे, श्रद्धा मोहनकार, शुभांगी तायडे, मुक्ता ढोके, पूजा सिस्टर, श्री. जैन, श्री. शेळके, भाजपचे विनोद टिकार, आशिष सुरेखा, उमेश देशमुख, विक्की रेठेकर, आकाश भडासे, हितेश पदमगिरवर आदी कोरोना योध्यांची उपस्थिती होती.

आ. अॅड. फुंडकर यांनी घेतली जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा

जिल्ह्यात बुलढाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, चिखली व देऊळगाव राजा या सहा ठिकाणी आजपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर योद्ध्यांना मोफत ‘कोविशील्ड’ लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात १९ हजार कोविशील्ड लस उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा आढावा आ. फुंडकर यांनीं जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांच्याकडून घेतला.

Exit mobile version