Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ.अनिल पाटलांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | अमळनेर मतदारसंघातील सारबेटे बु. आणि सारबेटे खु. या दोन्ही गावात आमदार अनिल पाटील यांनी उल्लेखनीय विकासकामे दिल्याने या विविध विकाम कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदारांच्या हस्ते संपन्न झाले.

 

सारबेटे बु. आणि सारबेटे खु. या दोन्ही गावातून वाहणाऱ्या नाल्यावर दीड कोटी निधीतून ४ योजनेअंतर्गत पूल बांधकाम करणे व सारबेटे बु. गावात जलजीवन मिशन अंर्तगत ४२ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. गावात आमदारांचे आगमन होताच जल्लोषात स्वागत करून सत्कार समारंभ पार पडला. यावेळी आमदारांनी विकासकामांचा आढावा मांडून विकासासाठी मागे हटणार नाही अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी डॉ. किरण पाटील, प्रा. सुरेश पाटील, एल. टी. नाना पाटील, महारू आण्णा, निलकंठ तात्या, भैय्या पाटील, बाळू पाटील, महेश पाटील, मधू आबा, पंकज पाटील, अलीम मुजावर, माजी सरपंच रज्जाक मेवाती, उपसरपंच नईम मेवाती उपस्थित होते. तसेच अरुणखा मेवाती, ग्रा.पं.सदस्य, अमजतखान मेवाती, ज्ञानेश्वर कोळी, शकील मेवाती, मेहमुदखान मेवाती, हसन मेवाती, बशीर मेवाती, ईसुक मेवाती, अमिन मेवाती, इस्त्राईल असम, असम दादा, रफिक मुल्ला, रफीक भैया, फारुक सर, सरदार मिस्तरी, उपसरपंच असलम खान उपस्थित होते.  यांच्या बरोबरच रऊफ भाई, मोहम्मद भाई, मुस्तकीन शहा, इरफान वाईफ शमीक मजीद, नजीम कईम, असलम मुमताज, मम्मु मिस्तरी वकील शेट.तसेच देवराम पाटील, गणेश गुलाब पाटील, नबी सरदार, साबीर ईस्माईल, इरफान गफुर, जावीद इमदाद, उस्मान रहीम, सादीक कादर, बिस्मीला उमर, मजीद बशीर, युसुफ रहेमान, अशीर हमीद उपस्थित होते.  तसेच राजेंद्र कोळी, शरद कोळी, लक्ष्मण कोळी, गफ्फार सरदार, सुभान मिस्तरी, जाकिर मिस्तरी, अलीम मेहबुब, मुमताज दादा, मोहमंद जहूरभाई, अली रज्जाक, युनुस युसुक, मनुस सांडू, हमीद मिस्तरी, जुबेर उमर, खलील मलन, अशपाक अहमद, ज्ञानेश्वर पाटील, विशाल ब्रम्हे, नाना ब्रम्हें, मसुद मज्जीद, अलताब रऊफ, रऊफ पटेल, रसुल शकुर, मजर अलम, जावेद लतीफ, जकीर कासम, जाकीर जमील, हरुन करीम, इजाज रफीक यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, कार्यकर्ते, पदाधिकरी उपस्थित होते.

 

सारबेटे खु.येथील विकासकामे –

आमदार निधीतून- सारबेटे फाटा ते सारबेटे खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रु.२५  लक्ष,सामाजिक न्याय विभाग- रास्ता काँक्रेटि करण करणे रक्कम रु. ५  लक्ष.,सामाजिक न्याय विभाग- काँक्रीट गटार करणे रक्कम रु. ३.३५ लक्ष.

 

सारबेटे बु.येथील विकासकामे –

आमदार निधीतून- सभामंडप बांधकाम करणे रक्कम रु  १५ लक्ष, जलजिवन मिशन- गावात पाणी पुरवठा करणे रक्कम रु ४२.६२  लक्ष., डी.पी.सी अंतर्गत- मराठी शाळेला वॉल कंपाऊंड बांधणे रक्कम रु.२०. ६3 लक्ष, ०४ योजनेअंतर्गत- पुल बांधकाम करणे ३  महिन्यात पुर्ण करणे रक्कम रु.१५०  लक्ष.

 

Exit mobile version