Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आहीरवाडी सरपंच विरुध्दचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आहीरवाडी येथील सरपंच सुनिता चौधरी यांच्या विरुद्ध आलेला अविश्वास ठराव तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या विशेष सभेत पुरेशी संख्याबळ नसल्याने फेटाळण्यात आला आहे.

 

आहीरवाडी येथील सरपंच सुनिता चौधरी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारीत करण्यात विरोधकांना सफशेल अपयश आले आहे.यामुळे गावातील राजकारण ढवळून निघाला आहे.दि १० मार्च रोजी तहसीलदार यांच्याकडे आहीरवाडी येथील सरपंच सुनिता चौधरी यांच्या विरुध्द  अविश्वास ठराव अर्ज तहसीलदार यांच्या कडे केला होता. अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आहीरवाडी येथे सर्व ग्राम पंचायत सदस्यांची विशेष सभा बोलवली यावेळी सरपंच सुनिता चौधरी यांच्या बाजूने ग्राम पंचायत सदस्य सरफराज तडवी, मीना तडवी,राहुल लहासे, रेखा तायडे यांनी मतदान केले तर विरुद्ध सदस्य संतोष महाजन, रणजीत चौधरी,राहुल महाजन,राबिया तडवी, शुभांगी चौधरी,पांडूरंग चौधरी,तेजल महाजन,तुळसाबाई महाजन,यांनी विरुद्ध मतदान केले अविश्वास ठराव पारित करायला तेरा पैकी दहा सदस्य अपेक्षित होते.परंतु आठ सदस्यांनी विरुध्द मतदान केल्याने अविश्वास ठरावाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

Exit mobile version