Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आहीरवाडीत घरांमध्ये शिरले पुराचे पाणी

रावेर, प्रतिनिधी | रावेर तालुक्याला चांगलेच झोडपले असून  आहीरवाडीत घरांमध्ये पुराचे पाणी शिरले  असून मूसळधार पावसाने रावेर तालुक्याला चांगलेच झोडपले आहे.

 

 

मुसळधार पावसाने ऐनपुर, सुलवाडी तसेच ऐनपुर निंबोल रस्ता बंद होता. रावेर शहरावळील जूना सावदारोड वरील पुलावरुन पाणी गेल्याने काही काळ बंद होता.दरम्यान या संदर्भात तहसिलदार यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न  केला असता त्यांनी माहिती दिली नाही. अहिरवाडी गावामध्ये पुन्हा मुसळधार पावसामुळे जोर वाढल्याने घरांमध्ये पाणी शिरले आहे. यावेळी उपसभापती धनश्री संदीप सावळे यांनी पाहणी करण्यासाठी गेले होते ,मोठ्या प्रमाणात पाऊस झाला धनगर वाडा परिसरामध्ये व बौद्ध वाडा परिसर शिवाजी चौक बाहेरपूरा भागात पाणी शिरलं होते.

 

Exit mobile version