Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती 30 जुलैपूर्वी भरावी

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय, निमशासकिय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना (ज्यांचेकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी) कार्यरत आहेत. अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यवसायिक, कारखाने इत्यादींनी त्यांच्याकडील माहे एप्रिल ते जून, 2020 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-1) दिनांक 30 जुलै, 2020 पर्यंत या विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करणे सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 नियमावली 1960 अन्वये बंधनकारक आहे.

माहे एप्रिल ते जून, 2020 या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारी त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-1) या विभागाच्या नमूद संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्ते वर क्लिक करुन आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अंतिम दिनांक 30 जुलै, 2020 पर्यंत भरावयाची आहे.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2239605 वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव श्रीमती अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version