Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसारामची तब्येत बिघडली; आयसीयूमध्ये उपचार

 

 

जोधपूर: वृत्तसंस्था ।  राजस्थानच्या जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची  तब्येत अचानक खालावल्याने त्याला महात्मा गांधी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

 

आसारामला मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तुरुंगातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, एक तास उलटूनही फरक न पडल्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आसारामने डॉक्टरांना आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. माझ्या पायाचे गुडघे काम करत नाहीत. तसेच मला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे त्याने सांगितले.

 

महात्मा गांधी रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर आसारामला मथुरादास माथुर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

Exit mobile version