आषाढी एकादशीनिमित्त वडिलांच्या स्मरणार्थ पालखीचे लोकार्पण

पाचोरा, प्रतिनिधी ।   पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे वडिलांच्या स्मरणार्थ आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुलाने गावफेरीसाठी आवश्यक असणारी विठ्ठल पालखी सामनेर विठ्ठल मंदिरास सप्रेम भेट दिली.

 

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व सामनेरचे भूमिपुत्र दिलीप साळुंखे यांनी यावर्षी त्यांचे वडील माजी सैनिक स्व. अभिमान रायभान पाटील यांचे स्मृतीप्रित्यर्थ गावात गावफेरीसाठी आवश्यक असणाऱ्या विठ्ठल मंदिर पालखीचे लोकार्पण ह.भ.प. योगीराज रामकृष्ण साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते  व बापूंचे जेष्ठ बंधू ह.भ.प. नारायण जिभुसो यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गावातील भजनी मंडळ व विठ्ठल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर पालखीची गावातून भक्तीफेरी काढण्यात आली.  भक्तीफेरीत आबालवृद्ध विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते.  भक्तीफेरीत गावातील विविध समाजाच्या वस्तीत व चौकात सर्व धर्मीय विठुरायाच्या भक्तांकडून पालखीचे पूजन करण्यात आले. शेवटी या पालखीच्या भक्तीफेरीची विठ्ठल मंदिरात सांगता झाली.

 

Protected Content