Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आश्वासनानंतर वॉटरग्रेसच्या कर्मचार्‍यांचा संप टळला (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांनी थकीत वेतन मिळण्यासह वेतनवाढीसाठी आजपासून संप पुकारला होता. मात्र, महापौर व आयुक्त यांच्या आश्वासनानंतर वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.

 

वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असतांना त्यांचे दोन ते तीन महिन्याचे वेतन थकलेले आहे. हे थकीत वेतन  मिळावे याकरिता आजपासून सकाळी टीबी हॉस्पिटल येथे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यावेळी या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कंपनीचा निषेध केला. कचरा संकलनासाठी एकही गाडी बाहेर पडली नव्हती. हा गोंधळ जवळपास तीन तास चालला. यानंतर महापौर जयश्री महाजन, आयुक्त देविदास पवार यांनी धाव घेत कर्मचाऱ्यांनी चर्चा करून संप न करण्याबाबत समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचारी आपली मागणीवर ठाम राहिले. यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी आज सायंकाळपर्यन्त महापालिका वॉटरग्रेस कंपनीच्या खात्यात पैसे जमा करेल यानंतर वॉटरग्रेस कंपनीकडून आपणास उद्या वेतन देईल असे आश्वासन दिले. तसेच हे आश्वासन पूर्ण न झाल्यास तुम्ही परवापासून संप पुकारू शकता असे स्पष्ट केले.

 

Exit mobile version