आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे बेमुदत धरणे आंदोलन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी ।जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नबाबत कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी सांगितले की, राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अनुक्रमे २०००/- व ३०००/- रुपये मोबदल्यात दरमहा वाढ करण्याचा शासनाने दिनांक १७ जुलै २०२० रोजी निर्णय घेतलेला आहे.  आमच्या माहितीप्रमाणे सदर शासन निर्णयानुसार जुलै २०२० ते ऑक्टोंबर २०२० या कालावधतील मानधनवाढीचा निधी आपल्या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे असे असतांना जळगाव जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सदरची मानधनवाढ आजतागायत अदा करण्यात आलेली नाही. परिणामी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. तरी सदर कालावधीतील मानधनवाढीची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी.

याप्रसंगी राज्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमा अंतर्गत आशा स्वयंसेविकांना १५०/- रुपये तसेच टिममधील स्वयंसेवकांना १००/- दैनिक भत्ता मंजूर करण्यात आला आहे. परंतु आशा स्वयंसेविकांना तसेच टिममधील स्वयंसेवकांना सदरचा दैनिक भक्ता आजतागायत अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांच्यात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. या बाबीचा विचार करुन माझे कुटुंब माझी जबाबदारीचा दैनिक भत्ता तातडीने अदा करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह कल्पना भोई, भगिरथी पाटील, भारती नेमाडे, सुनंदा पाटील, सुनिता भोसले, भारती तयाडे, माया बोरसे, भारती चौधरी, अनिता कोल्हे, उषा मोरे, करुणा कुमावत, संगीता पाटील, उषा महाजन, सुनिता विनंते आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

 

भाग १ :

https://www.facebook.com/508992935887325/videos/228206518680754

भाग २ :

https://www.facebook.com/508992935887325/videos/1493989850991992

Protected Content