Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

 

 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली  या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित  देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

 

 

कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

Exit mobile version