आशा-गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा : सीटूची आयुक्तांकडे मागणी (व्हिडिओ)

जळगाव , प्रतिनिधी । महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या आशा-स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कोवीड-१९ प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सूरू करण्यात यावा व नवीन आशा स्वयंसेविका यांना त्वरित प्रशिक्षण देऊन ५  महिन्यांचे थकित मोबदला इतर थकबाकी आशांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटूतर्फे  निवेदनाद्वारे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना करण्यात आली.

 

निवेदनाचा आशय असा की,  जळगाव महानगर पालीकेत आरोग्य विभागात आशा वर्कर्स व गट प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या महिलांना कोवीड १९, अंतर्गत शासनाने देय असतिल प्रोत्साहन भत्ता शासनाने बंद केले आहे तसेच नवीन आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देणे अनिवार्य असतांना प्रशिक्षण दिले नाही व प्रशिक्षण अभावी सर्व नवीन व जून्या आशांना त्यांना मिळणाऱ्या कामाच्या मोबदला मानधन, नाकारले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगर पालीका प्रशासन जोपर्यंत नवीन आशांना प्रशिक्षण देत नाही त्यांना कामाचा थकीत मोबदला मानधन देत नाही तोपर्यंत सर्व आशांनी कोवीड-१९ शी संबंधातील सर्व कामे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. नवीन आशांना सत्वर प्रशिक्षण दयावे शासनाने बंद केलेला प्रोत्साहन भत्ता सत्वर सूरू करण्यात यावा, व सर्व आशांना त्वरित प्रशिक्षण देऊन त्यांना रितसर कोवीड-१९ प्रोत्साहन भत्ता थकीत मोबदला व इतर देयके सत्वर अदा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कॉ. प्रविण चौधरी, कॉ.विजय पवार, कॉ.प्रतिभा काळे, वैशाली बारी आदींची स्वाक्षरी आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1021488078394393

Protected Content