Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशादीप वसतीगृहाचे प्रकरण विधानसभेत गाजले; दोन दिवसांत चौकशीचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी । जळगाव येथील आशादीप वसतीगृहातील मुलींसोबत घडलेल्या अत्याचाराचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. या प्रकरणी चार सदस्यांची समिती नेमून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसात चौकशीचे निर्देश दिले आहेत.

आशादीप वसतीगृहात तरूणींना पोलीस नग्न करून नाचवत असल्याचा भयंकर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल मंगला सोनवणे यांच्यासह अन्य समाजसेवकांनी आवाज उठविल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यांनी कालच जिल्हाधिकार्‍यांना ही व्हिडीओ क्लीप सोपवली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून आज विधीमंडळात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि अन्य अन्य सदस्यांनी या प्रकरणी सरकारचा निषेध करून याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार सदस्यीय समिती नेमून दोन दिवसात चौकशी करून अहवाल येईल. यानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Exit mobile version