Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आव्हाणे शिवारातून तरूणाची दुचाकी लांबविली; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी ।  आव्हाणे शिवारातील जिजाऊ नगरातून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक शालीग्राम पाटील (वय-४०) रा. जिजाऊ नगर, आव्हाणे शिवार जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. २० फेब्रुवारी रोजी ते नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता (एमएच १९ सीके ९८१५) क्रमांकाच्या दुचाकीने कामावरून घरी आले. दुचाकी घरासमोर पार्कींग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. परिसरात दुचाकी शोध घेवून न मिळाल्याने त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे करीत आहे.

Exit mobile version