Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आव्हाणे येथे किसान मोर्चामध्ये सहभागासाठी बैठक (व्हिडिओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव भाजपातर्फे ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांच्या सहभागासाठी आव्हाणे येथे पंचायत समिती सदस्य अॅड. हर्षल चौधरी यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी विरोधी महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात सोमवार ९ नोव्हेंबर जिल्हाधिकारी कार्यलयांवर भाजपातर्फे भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून केळी पीक विमा निकष बदलून पूर्वीप्रमाणे होणे, अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळणे आदी मागण्या करण्यात येणार आहेत. याबाबत आव्हाणे येथे भाजपाचे जळगाव पंचायत समितीचे सदस्य अॅड. हर्षाल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपण राज्य सरकारच्या विरोधात नसून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात असल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले. ही बैठक विठ्ठल मंदिर येथे घेण्यात आली याप्रसंगी अॅड. सत्वशील जाधव, अमोल चौधरी व शेतकरी आदी उपस्थित होते.

Exit mobile version