Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आव्हाणे गावात मध्यरात्री घरातून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविली;

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून  दागिने व रोकड असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मंगळवारी २३ मे रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भागवत चावदस इंगळे (वय-६०) रा. आव्हाणे ता. जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० मे रोजी १० वाजता ते जेवण करून घराच्या पुढच्या हॉलमध्ये झोपले होते. उकाडा असल्यामुळे हॉलचा दरवाजा उघडा ठेवला होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घरात प्रवेश करून कपाटातून ३४ हजार रुपये किमतीचे दागिने आणि ६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भागवत इंगळे यांनी मंगळवारी २३ मे रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून  तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Exit mobile version