Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. एका अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले असून, आळशी लोकांसाठी हा धोक्याचा इशाराच आहे.

 

आळस हा माणसांचा शत्रू आहे, असं शालेय जीवनापासूनच ऐकायला मिळतं. आळस माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असंही सांगितलं जातं. पण, आता ही आळशीवृत्तीच कोरोना मृत्यूच कारण ठरू शकणार आहे.

 

व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींनि व्यायाम करणं सोडून दिलं. शारीरिक हालचाली (चालणं/फिरणं) कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागत आहे, असं नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.

 

या संशोधनासाठी ५० हजार बाधितांचा अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना संसर्गाचा आणि जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता यापेक्षाही शारीरिक हालचाल (शारीरिक निष्क्रियता) न करणे, यामुळे कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा ४८ हजार४४० लोकांमध्ये  लक्षणं अधिक दिसून आली.  काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काहींना आयसीयूची भरती करावं लागलं, काहींचा मृत्यू झाला. जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अमेरिकेत हा अभ्यास करण्यात आला.

Exit mobile version