Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आलोक वर्मा यांची हकालपट्टी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असला तरी सिलेक्ट कमिटीने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याबाबतचा आदेश मंगळवारी कोर्टाने रद्द केला होता. कोर्ट म्हणाले, वर्मांना हटवण्याची पद्धत चुकीची होती. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सिलेक्ट कमिटीला आठवडाभरात निर्णय घेण्यास सांगितले. या निर्णयानंतर वर्मा कार्यालयात रुजू होऊ शकतील. मात्र समितीचा निर्णय येईपर्यंत त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. ते फक्त दैनंदिन कामकाजच पाहतील. त्यांना नवीन एफआयआर दाखल व कुणाची बदलीही करता येणार नाही असा निर्णय न्यायालयाने दिला होता. तथापि, परंतु कामावर रुजु झालेल्या आलोक वर्मा यांची दुसर्‍याच दिवशी हकालपट्टी करण्यात आली आहे. सिलेक्ट कमिटीने आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्याची शिफारस केली होती. गुरुवारी सिलेक्ट कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यामध्ये आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Exit mobile version