Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर. टी. लेले कनिष्ठ महाविद्यालयांतून बारावीत शुभांगी बोदडे प्रथम

पहूर,  प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी .लेले कनिष्ठ महाविद्यालयाचा इ . 12 वी कला शाखेचा निकाल 96 टक्के लागला असून 49 पैकी 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . शुभांगी रवींद्र बोदडे या विद्यार्थिनीने ७५ टक्के गुण मिळवित महाविद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. पहूर येथील आर .टी .लेले हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच बारावीचा कला शाखेचा निकाल 96 टक्के लागला आहे. पहूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शुभांगी रवींद्र बोदडे ही महाविद्यालयातून प्रथमआल्याने तिच्या शेतकरी – आई वडिलांनी आपल्या घरीच गुणवंत लेकीचे मिठाई भरवून उज्ज्वल यशाचे कौतुक केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार गिरीश महाजन ,उपाध्यक्ष साहेबराव देशमुख , सचिव डॉ. अनिकेत लेले , संचालक राजधर पांढरे , अॅड . संजय पाटील , गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे , केंद्र प्रमुख भानुदास तायडे , मुख्याध्यापक सी .टी . पाटील ,पर्यवेक्षक आर .बी .पाटील ,वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे . गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

Exit mobile version