Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्सेनिक गोळ्या वाटपासाठी शिक्षण विभागाची पावणे पाच लाखाची मदत

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच पातळीवर कोरोनाबाबत मदतीचा ओघ सुरू आहे. कोरोना संकट काळात आर्सेनिक गोळ्या वाटपासाठी शिक्षण विभागागातील अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आदींनी पावणे पाच लाखाची मदत दिली आहे.

नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढणे कामी आर्सेनिक ३० गोळ्या उपयुक्त असून यासाठी निधीची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासन व रेडक्रॉस संस्थेच्यावतीने इन्सिडेंट कमांडर म्हणून काम पाहत असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र समिती अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांनी शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे व माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना मदतीचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी स्वतः पाच हजार रुपये देणगी देत मार्गदर्शन केले. या सामाजिक कार्यात दातृत्वाच्या भावनेने शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सढळ हाताने मदत केली. सुमारे चार लाख , शहात्तर हजार नऊशे अकरा रुपये देणगी रेडक्रॉस संस्थेला ऑनलाइन देण्यात आली. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात शिक्षण विभागातील शिक्षक , अधिकारी व कर्मचारी रेशन दुकान, चेक पोस्ट , हॉस्पिटल , रेल्वे स्टेशन, प्रतिबंधात्मक क्षेत्र इत्यादी ठिकाणी दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच आर्थिक योगदान ही दिले .त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version