Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्दश ग्रामसेवक रूबाब तडवी सेवानिवृत्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एका अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहुन दोन दशकापेक्षा अधिक काळ आपली प्रशाष्टकीय सेवा बजावणारे एक कर्तव्यनिष्ठ आणी प्रेमळ असे दुहेरी गुण असलेले व्यक्ती ग्रामसेवक रुबाब महंमद तडवी हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन आज सेवानिवृत्त होत आहे .

 

यावल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामसेवक म्हणुन मागील २९ वर्ष आव्हानात्मक प्रशासकीय सेवा बजावणारे रूबाब महंमद तडवी हे मुळचे पाल तालुका रावेर येथील रहिवासी आहेत.  रूबाब तडवी यांचा पाल येथील जन्म कष्टकरी शेतकरी महंमद तडवी यांच्या कुटुंबात झाले .पाल येथील शासकीय आदीवासी आश्रमशाळेत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले, प्रथम ते १९८८मध्ये न्हावी येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात फिल्डवर्क वर त्यांनी एक वर्ष कार्य केले.

 

त्यांनी १९९४मध्ये त्यांनी सर्वप्रथम ग्रामसेवकपदाची सुत्रे सांभाळली. नंतर त्यांनी मालोद , वाघझिरा ,ईचखेडा , चारमळी या ठीकाणी ग्रामसेवक म्हणुन सेवा बजावली , जामन्या गाडर्‍या या सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातीत गावात त्यांनी  वर्ष प्रशासकीय सेवा बजावली. दरम्यान त्यांना महाराष्ट्र शासनाचा २े१६-१७चा आर्दश ग्रामसेवक पुरस्कार देखील मिळाला आहे. याच बरोबर त्यांनी वर्ष यावल तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका अध्यक्ष म्हणुन कार्य केले . अशा प्रकारे यशस्वी सेवा देणारे रूबाब महंमद तडवी हे दिनांक ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांना आज निरोप देण्यात येणार आहे.

Exit mobile version